महाडमध्ये आणीबाणीतील सत्याग्रहींच्या हस्ते ब्राह्मण सभा येथे ध्वजारोहण

महाडमध्ये आणीबाणीतील सत्याग्रहींच्या हस्ते ब्राह्मण सभा येथे  ध्वजारोहण
Published on

महाडमध्ये आणीबाणीतील सत्याग्रहींच्या हस्ते ब्राह्मण सभा येथे ध्वजारोहण
महाड, ता. २७( बातमीदार) : ब्राह्मण सभेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी सुमारे पाच दशकांपूर्वी आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या सत्याग्रहींच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यामध्ये सुधीर महाजन, प्रवीण पिंपुटकर, अतुल पुरोहित यांचा समावेश आहे.
सुधीर महाजन यांनी आणीबाणीच्या तुलनेत देशातील आजची लोकशाही अधिक सशक्त व प्रगल्भ असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तर, प्रवीण पिंपुटकर यांनी आमचा सत्याग्रह हा लोकशाही मूल्यांच्या विरोधातील होता, असे सांगितले. अतुल पुरोहित यांनी एक भारतवासिय म्हणून हुकूमशाही विरोधात झालेल्या आंदोलनात सत्याग्रहात सहभाग ही कर्तव्यपूर्ती असल्याची भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com