मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ''मताधिकार'' मोबाईल ॲप

मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ''मताधिकार'' मोबाईल ॲप

Published on

मतदारांच्या मदतीसाठी ‘मताधिकार’ ॲप
यादीतील नाव व केंद्र शोधण्यासाठी उपयोग

महाड, ता. ५ (बातमीदार) : निवडणुकीच्या वेळी मतदार यादीमध्ये नाव नसणे, मतदान केंद्र माहिती नसणे तसेच मतदार यादीमधील गोंधळ, असे प्रकार वारंवार घडत असतात. हे टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
७ फेब्रुवारीला राज्यामध्ये १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. याकरिता रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या ११७ गणांसाठी निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील १७ लाख ३८१ मतदार यासाठी मतदान करणार असून, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मताधिकार ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदाराला त्याचे नाव या मतदान केंद्राच्या यादीत नसल्याने वेगवेगळ्या मतदान केंद्रावर नाव शोधण्यासाठी वेळ वाया घालवावा लागतो व मनस्ताप देखील होतो. हे सर्व टाळण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com