रायगडावर छत्रपती शिवरायांना पोलिसांची मानवंदना

रायगडावर छत्रपती शिवरायांना पोलिसांची मानवंदना

Published on

रायगडावर छत्रपती शिवरायांना पोलिसांची सवाद्य मानवंदना

महाड, ता. १९ (बातमीदार) : स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ला येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रायगड पोलिसांच्या वतीने राजदरबारात सवाद्य मानवंदना देण्यात आली.

तहसीलदार महेश शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलिस दलाने मानवंदना दिली व राज्यगीत सादर करण्यात आले. ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, कल्याण, कोपरगाव आदी ठिकाणांहून आलेल्या शिवभक्तांनी दुचाकी व इतर वाहनांतून गडावर येत जयघोष केला. अनेक जण शिवज्योत घेऊन पहाटेपासूनच गडावर पोहोचले होते.

मेघडंबरी व होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन शिवप्रेमी माघारी परतले. महाड शहरासह तालुक्यातील गावांमध्येही पोवाडे व शौर्यगीतांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
.....
फोटो - तहसीलदार महेश शितोळे यांच्या उपस्थितीत मानवंदना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com