महानगरपालिकेच्या पहिल्या सभेत तात्पुरती पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय
महाड नगरपालिकेच्या पहिल्या सभेत तात्पुरत्या पार्किंगचा निर्णय
महाड, ता. २८ (बातमीदार) : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी व पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत दोन ठिकाणी तात्पुरती पार्किंग व्यवस्था उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच दुकान गाळ्यांचा लिलाव, सार्वजनिक स्वच्छता व इतर विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सभागृहाची पहिली सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या या सभेत शहरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन भाजी मंडई परिसर व नगरपालिका कार्यालयाजवळील आरक्षण क्रमांक ५५ मधील जागा येथे तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आले. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अडथळा निर्माण करणारी वाहने उचलण्यासह त्यासाठी ठेकेदार नेमण्याचाही निर्णय घेण्यात आला. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
लाड समितीच्या शिफारशीनुसार पात्र सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत चर्चा झाली. तसेच पालिकेच्या मालकीचे बंद व नव्याने बांधलेले गाळे यांची भाडेनिश्चिती करून लिलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. गाळ्यांचा लिलाव झाल्यानंतर पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळेल, असे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रशासकीय काळात गेल्या पाच वर्षांत गाळा लिलावाबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पालिकेचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. चर्चेत बांधकाम सभापती सुमित पवार, आरोग्य सभापती वजीर कोंडीवकर तसेच नगरसेवक संकेत वारंगे यांनी सहभाग घेतला.
-------------
स्वच्छतेच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, गटारांवर स्लीपर टाकणे, जिजामाता उद्यान ते बालाजी मंदिर परिसरात रस्ता रुंदीकरण तसेच सदस्यांनी सुचवलेल्या विविध विकासकामांना मंजुरी देण्याचा विषयही सभेत घेण्यात आला. नवीन सभागृहाची ही पहिलीच बैठक असल्याने काही सदस्यांना अनुभव कमी असला तरी सभा शांततेत पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

