महाड येथे हाफ मॅरेथॉन
बिर्ला ओपस पेंटची १ मार्चला हाफ मॅरेथॉन
मिलिंद सोमण व सुफिया सुफी यांची हजेरी
महाड, ता. २७ (बातमीदार) : आदित्य बिर्ला उद्योग समूहाच्या ग्रासीम इंडस्ट्रीज अंतर्गत महाड औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या बिर्ला ओपस पेंट या कंपनीच्या माध्यमातून १ मार्चला महाड येथे हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी हे मॅरेथॉनचे दुसरे वर्ष असून, यामध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण आणि प्रसिद्ध सुफी गायिका सुफिया सुफी या उपस्थित राहणार आहेत.
महाड परिसरातील धावपटू फिटनेसप्रेमी आणि कुटुंबांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. १ मार्चला पहाटे ५ वाजता काकर तळ येथील भिलारे मैदानातून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २१.१ किलोमीटरची टाईम्ड मॅरेथॉन, १० किलोमीटरची टाईम्ड युथ रन, पाच किलोमीटरची नॉन टाईम्ड ड्रीम रन आणि तीन किलोमीटरची नॉन टाईम्ड फन रन अशा चार श्रेणीमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. प्रत्येक स्पर्धांसाठी पहिल्या तीन क्रमांकांकरिता आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, बक्षिसाची एकूण रक्कम पाच लाख ११ हजार रुपये आहे. या स्पर्धेबाबत कंपनीतर्फे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला बिर्ला पेंट डिव्हिजनचे जनसंपर्क अधिकारी अरुण शिर्के, उत्पादन विभागाचे व्यवस्थापक दीपक बुट्टे, मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक अमीर चव्हाण मनुष्यबळ विभागाचे राहुल बारटक्के, आकाश वर्मा, उमेश खोत, जयेश सवसानी हे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी या मॅरेथॉनच्या टी-शर्टचे तसेच पदकांचे अनावरणदेखील करण्यात आले. याबाबत आवश्यक असणारा पोलिस परवाना तसेच इतर परवानगी, वैद्यकीय पथक, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर सर्व प्रकारचे सहकार्य कंपनीतर्फे दिले जाणार आहे. महाडमध्ये ही मोठी मॅरेथॉन असल्याने नागरिकांनादेखील याची उत्सुकता लागली आहे.
..........
फोटो -टी-शर्टचे तसेच पदकांचे अनावरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

