चवदार तळे वर्धापन दिन एकत्र साजरा करण्याची मागणी
चवदार तळे वर्धापन दिन एकत्र साजरा करण्याची मागणी
महाड, ता. ९ (बातमीदार) : चवदार तळे सत्याग्रहाचा ९९वा वर्धापन दिन तसेच पुढील वर्षी होणारा शतकमहोत्सवी वर्धापन दिन आंबेडकरी विचारांच्या सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी एकत्रितपणे ‘एक सभा - एक व्यासपीठ’ या संकल्पनेतून साजरा करावा, अशी मागणी पत्रकार व मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव मनोज खांबे यांनी केली आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भारतीय रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी (गवई गट) अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांना पाठविले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे २० मार्च १९२७ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला होता. जात, धर्म आणि वर्णभेदाच्या विरोधात समानतेचा संदेश देणारा हा ऐतिहासिक लढा मानला जातो.
चौकट
शतकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर एकतेचे आवाहन
२०२७मध्ये चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या विविध संघटना व पक्ष स्वतंत्र कार्यक्रम घेत असल्याने एकतेचे चित्र दिसत नाही. त्यामुळे शतकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर कार्यक्रम घ्यावा, असे आवाहन खांबे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

