रोटरी क्लबतर्फे पैठणी साडी महोत्सव
रोटरी क्लबतर्फे पैठणी साडी महोत्सव
महाड, ता. १९ (बातमीदार) : महिलांसाठी पारंपरिक साड्यांचे आकर्षण ठरणारा ‘सिल्क व पैठणी साडी महोत्सव’ रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे यंदाही आयोजित करण्यात आला आहे. हा तीनदिवसीय महोत्सव २० ते २२ मार्च या कालावधीत ब्राह्मण सभा सभागृह येथे होणार आहे.
या महोत्सवात पारंपरिक व आधुनिक साड्यांचा समावेश असणार आहे. पाच हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन देण्यात येणार असून, बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष सुधीर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव गुरुपाद कोंडगुळी, खजिनदार महेश इब्रामपूरकर, प्रकल्प अध्यक्ष अश्विनी पाडळकर, क्लबचे सर्व सभासद आणि रोटरिअन्स यांनी केले आहे. महोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

