

महाडच्या तनय लाडला जलतरणात सलग दोन सुवर्णपदके
महाड, ता. ३० (बातमीदार) : थायलंडमधील क्रॅबी येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक दर्जाच्या ''ओशनमॅन क्रॅबी २०२६'' या खुल्या जलतरण स्पर्धेत महाड जिल्ह्यातील १३ वर्षीय उदयोन्मुख जलतरणपटू तनय तुषार लाड याने अभूतपूर्व कामगिरी करत २ सुवर्ण आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदके पटकावून तिरंगा अभिमानाने फडकावला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तनयने ५०० मीटर (ओशनकिड्स) १५ वर्ष वयोगटात अवघ्या ६ मिनिटे ५७ सेकंदात अंतर पार करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. २ किमी (स्प्रिंट) या श्रेणीतही त्याने आपले वर्चस्व टिकवून ठेवत दुसरे सुवर्णपदक मिळवले.
सलग दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर ५ किमी ''हाफ ओशनमॅन'' शर्यतीत १९ वर्ष वयोगटात त्याने सहभाग घेतला. अत्यंत आव्हानात्मक लाटांवर मात करत त्याने या श्रेणीत कांस्यपदक जिंकले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके जिंकणारा तो या स्पर्धेतील सर्वात लहान यशस्वी भारतीय खेळाडू ठरला आहे.
तनय हा महाड येथील रहिवासी असून न्यू होरायझन्स पब्लिक स्कूल, पनवेल येथील ८ वीचा विद्यार्थी आहे. त्याला पलावा येथील ''रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी'' (ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर) येथे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.