महाड नगरपरिषदेला 1 कोटी 70 लाखांचा विकास निधी मंजूर

महाड नगरपरिषदेला 1 कोटी 70 लाखांचा विकास निधी मंजूर
Published on

महाड नगरपरिषदेला १ कोटी ७० लाखांचा विकास निधी मंजूर
शहरातील पायाभूत सुविधांना मिळणार गती
महाड, ता. ३ (बातमीदार) : महाड नगरपरिषदेसाठी तब्बल एक कोटी ७० लाखांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्याच्या दृष्टीने या निधीचे प्रभागनिहाय वाटप करण्यात आले असून, लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. या निधीतील मोठा भाग हा शहरातील सांडपाण्याची व्यवस्था (गटारे) आणि अंतर्गत रस्त्यांसाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः प्रभाग ९ आणि २ मध्ये विकसित होणाऱ्या उद्यानांमुळे नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच शाळा क्रमांक ५ च्या मैदानासाठी मिळालेल्या निधीमुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाला असून नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com