प्रलंबित मागण्यासाठी निवृत्त पोलिसांचे 10 एप्रिल ला धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यासाठी निवृत्त पोलिसांचे 10 एप्रिल ला धरणे आंदोलन
Published on

प्रलंबित मागण्यांसाठी निवृत्त पोलिसांचे १० एप्रिलला आंदोलन
महाड, ता. ५ (बातमीदार) : राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असताना, रायगड जिल्हा पोलिस दलात मात्र या कामाला गती मिळत नसल्याने सेवानिवृत्त पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दप्तर दिरंगाईचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १०) अलिबाग येथील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा निवृत्त पोलिस कल्याणकारी संस्थेने दिला आहे.
रायगड जिल्ह्यात सुमारे ६५० सेवानिवृत्त पोलिस अंमलदार आहेत. पोलिस हवालदार पदोन्नती वेळी एक वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करावी आणि पडताळणी पथकाकडून ती प्रमाणित करून घ्यावी, असे स्पष्ट आदेश १७ मार्च २०२२ रोजी गृह विभागाने दिले होते. यानंतर २८ मार्च २०२२ रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाने सर्व घटक प्रमुखांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या, परंतु तरीही रायगड पोलिस दलाकडून आजपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वेतनवाढीस पात्र असलेल्या सेवानिवृत्त अंमलदारांनी जून २००५ पासून अर्ज सादर करण्यास सुरुवात केली होती. डिसेंबर २०२५ पर्यंत ८५ अर्ज पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा झाले आहेत, परंतु कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद संघटनेला मिळाला नाही. २४ नोव्हेंबरला २५ सदस्यांनी पोलिस उपअधीक्षकांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही प्रगती झाली नाही. रायगडमध्ये ही प्रक्रिया रखडल्यानंतर सेवानिवृत्त पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. याविरोधात आता जिल्हा अधीक्षक पोलिस कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ यामध्ये धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त पोलिस सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कासार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com