

विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याने
दोन दिवसांची पोलिस कोठडी
महाड, ता. ६ (बातमीदार) : महाड शहरातील खासगी शिकवणीतील एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी संबंधित शिक्षकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, शिकवणीचा संचालक असलेल्या शिक्षकाला माणगाव न्यायालयाने आज दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
महाड शहरात गांधी क्लासेस या नावाने सुनील गांधी यांची ३० ते ४० वर्षांपासून खासगी शिकवणी आहे. गांधी स्वतः या क्लासमध्ये शिकवण्याचे काम करतात. दहावीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी २०२४-२५ या कालावधीत शिकवणीसाठी गांधींकडे जात होता. परंतु या शिकवणीमध्ये गांधी यांच्याकडून या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार सुनील गांधी यांच्याविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधी याने मुलाबरोबर सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ या काळात लैंगिक वर्तन केले. तसेच शिकवणी वर्गाच्या दुसऱ्या मजल्यावर जबरदस्तीने नेत तेथे गांधी याने या विद्यार्थ्याचे कपडे काढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार महाड शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. आरोपीला माणगाव न्यायालयासमोर हजर केले असता माणगाव न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.