

महाडमध्ये चार तालुक्यांची खरीप हंगामपूर्व कार्यशाळा
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनाबाबत मार्गदर्शन
महाड, ता. २३ (बातमीदार) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि नियोजनबद्ध शेतीला चालना मिळावी या उद्देशाने महाड येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सोमवारी (ता. २०) खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील शेतकरी व कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, सभापती प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, उपसभापती सुरेश महाडिक, सदस्य मनाली काळीजकर, रेणुका देशमुख, संदीप खिडबिडे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे उपस्थित होते. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
रोहा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. जीवन आरेकर यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. विविध तालुक्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाचा आराखडा सादर केला. सुधारित वाण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जलसंधारण, पिक विमा योजना आदी विषयांवर सत्रे झाली. प्रगतशील शेतकरी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
चौकट
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अत्यावश्यक
खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी सुधारित बियाणे, जलसंधारण तंत्र आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यांचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक पद्धती स्वीकारण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.