

अल्पवयीन विद्यार्थ्याचा लैंगिक छळ
संचालक गांधीचा जामीन फेटाळला; १४ दिवसांची कोठडी
महाड, ता. २४ (बातमीदार) : महाड शहरात खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी संचालक सुनील गांधी याला अटक करण्यात आली होती. यात सुनील गांधी याने जामिनासाठी अर्ज केला होता, पण ही मागणी माणगाव जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली असून, त्याला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
महाड शहरामध्ये गांधी क्लासेस या नावाने सुनील गांधी याचे खासगी शिकवणी वर्ग आहेत. सुनील गांधी स्वतः या क्लासमध्ये शिकवण्याचे काम करतो. दहावीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी सुनील गांधी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी जात होता. परंतु या शिकवणीत गांधी याच्याकडून या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार गांधी याच्याविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार गांधीने या मुलाबरोबर सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ या काळात विकृत लैंगिक चाळे केले. तसेच सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शिकवणी वर्गाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वतःच्या बेडरूममध्ये जबरदस्तीने नेले. तेथे या विद्यार्थ्याचे कपडे काढून गांधीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित अल्पवयीन मुलाने ४ एप्रिलला तक्रार दाखल केल्यानंतर गांधी याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. यानंतर पुन्हा २२ एप्रिलला जामिनासाठी माणगाव सत्र न्यायालयामध्ये दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. अखेर या युक्तिवादानंतर न्यायालयाने गांधी याचा जामीन फेटाळला आणि त्याला पुन्हा १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.