महाड तालुक्याचा दहावी निकाल ९६.९६ टक्के

महाड तालुक्याचा दहावी निकाल ९६.९६ टक्के
Published on

महाड तालुक्याचा दहावी निकाल ९६.९६ टक्के
२८ शाळांचा १०० टक्के निकाल; समृद्धी खैरे तालुक्यात प्रथम
महाड, ता. ८ (बातमीदार) : महाड तालुक्यात दहावीच्या परीक्षेत यंदा ९६.९६ टक्के निकाल लागला असून, २८ शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली आहे. यामुळे तालुक्यात शैक्षणिक समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुकुल शाळेची विद्यार्थिनी समृद्धी खैरे हिने ९६.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
यंदा परीक्षेसाठी १,१४७ मुले व ९९४ मुली असे एकूण २,१४१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १,१०४ मुले व ९७२ मुली असे एकूण २,०७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमाच्या ५७ शाळांपैकी २८ शाळांनी १०० टक्के निकाल देत उत्कृष्ट कामगिरी केली.
वि. ह. परांजपे विद्यालयाचा स्पर्श काकडे (९६.४०%), दगडूशेठ पार्टे विद्यालयाची समृद्धी नागरे (९५.६०%), थरवळ कन्या विद्यालयाची नव्या सोनकर (९५%) आणि नवयुग विद्यालयाची मनस्वी गढरी (९३.८०%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर चांगली कामगिरी करत गुणवत्ता सिद्ध केली आहे. गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

चौकट :
महाड तालुक्याचा निकाल (संक्षेप)
एकूण विद्यार्थी : २,१४१
उत्तीर्ण विद्यार्थी : २,०७६
एकूण निकाल : ९६.९६%
१००% निकाल असलेल्या शाळा : २८
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com