महाडमध्ये पायाभूत सुविधांवर चर्चा

महाडमध्ये पायाभूत सुविधांवर चर्चा
Published on: 

महाडमध्ये पायाभूत सुविधांवर चर्चा
महाड, ता. ७ (बातमीदार) : महाड पंचायत समिती आणि नगरपालिका प्रशासनातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची शहर व तालुक्यातील मूलभूत सुविधा तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत ५ ऑक्टोबरला आढावा बैठक झाली. रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
महाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या शासनस्तरीय संपर्काचा प्रभावी उपयोग करण्यात येईल, असे विकास गोगावले यांनी सांगितले. बैठकीला नगराध्यक्ष सुनील कविस्कर, सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य मन्सूर ताज व मनाली काळीजकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे उपस्थित होते.

पाणीपुरवठ्यासाठी नियोजन
महाड शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नडगाव येथील खांडीतील पाणीसाठ्याचा उपयोग करण्याबाबत चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी उपलब्ध साठा पुरेल, यासाठी नियोजन करण्याचे ठरले. पालिका हद्दीतील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळावा, अशी मागणी सुनील कविस्कर यांनी केली. याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन विकास गोगावले यांनी दिले.

रिक्त पदांचा आढावा
शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाला औषधसाठा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकासकामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे विकास गोगावले यांनी स्पष्ट केले.
.......
फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com