खारघरमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंती सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंती सोहळा
खारघरमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंती सोहळा

खारघरमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंती सोहळा

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी ‘डक्सलेजिस’ या विधी सल्लागार संस्थेने खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खारघर येथील ‘कामधेनू कामर्झ’ या व्यावसायिक संकुलात उद्या (ता. ३) सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारीला जगभरात साजरा केला जातो. बौद्धिक संपदा क्षेत्रात कार्यरत डक्सलेजिस संस्थेने देशात ज्ञानाच्या माध्यमातून खरी बौद्धिक संपदा निर्माण करणाऱ्या सावित्रीबाईंना अभिवादन करण्यसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डक्सलेजिसचे प्रमुख दिव्येंदू वर्मा यांनी केले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ‘बौद्धिक संपदा क्षेत्रात महिलांचे योगदान’ विषयावर जगभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारतात हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी डक्सलेजिस संस्थेवर सोपविण्यात आली होती.