उद्योग क्षेत्रातही मराठीचा वापर वाढावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग क्षेत्रातही
मराठीचा वापर वाढावा!
उद्योग क्षेत्रातही मराठीचा वापर वाढावा!

उद्योग क्षेत्रातही मराठीचा वापर वाढावा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : काळानुरूप मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यापूर्वी सतराव्या शतकात, तसेच ब्रिटिशकाळात राज्यात अनेक बदल झाले. साहित्याचे लोकशाहीकरण झाले. मराठी भाषा ही संस्कृतीशी जशी संबंधित आहे, तशी ती रोजगार, पर्यटन, उद्योगांशीही संबंधित आहे. त्यामुळे उद्योजकांनीही आपला व्यवसाय करताना मराठीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईत आयोजित संमेलनात ‘मराठी भाषा ः काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. परिसंवादात लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ आणि श्रीकांत बोजेवार यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘आपल्या मराठी भाषेचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. त्यातल्या त्यात स्त्रीची बोली भाषा अधिक शक्तिशाली आहे. मराठी बोलताना अनेकदा हातवारे होतात. ती केवळ पुतळ्यासारखी नाही. मराठी भाषा ही महाराष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिवार्य असावी असा कायदा आहे, त्याची नीट अंमलबजावणी व्हावी. राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा, इतिहास, शास्त्र, गणित, शेतीमध्ये ज्ञान देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबत समन्वय व्हावा. ‘विश्वात्मके देवे’ या दृष्टिकोनातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी. पुस्तकांची खरेदी, वाचन मोठ्या प्रमाणात व्हावे. कठीण शब्द वापरण्यापेक्षा सोप्या शब्दांचा वापर व्हावा. अशाच प्रकारचे संमेलन पुण्यातही घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.