गोवरचा आणखी एक नवा रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरचा आणखी एक नवा रुग्ण
गोवरचा आणखी एक नवा रुग्ण

गोवरचा आणखी एक नवा रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईत गोवर बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ नियंत्रणात आणण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे.‌ त्यामुळे बुधवारी दिवसभरात केवळ एका नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ५५३ वर पोहोचली आहे. मुंबईत ७८ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला असून ३७५ प्रभागात गोवरचा फैलाव झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत गोवरचा फैलाव झाला आहे. सध्या मुंबईत २२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.