महापालिका रुग्णालयात नव्या सीटी स्कॅन मशीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका रुग्णालयात 
नव्या सीटी स्कॅन मशीन
महापालिका रुग्णालयात नव्या सीटी स्कॅन मशीन

महापालिका रुग्णालयात नव्या सीटी स्कॅन मशीन

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या प्रमुख रुग्णालयांमध्ये वारंवार सीटी स्कॅन यंत्रणा बंद असण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे रुग्णांना खासगी केंद्रावरून सीटी स्कॅन करावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो; मात्र लवकरच या तीन रुग्णालयांमध्ये नव्या सीटी स्कॅन यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये दररोज किमान पाच ते सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. यापैकी काही रुग्णांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यास अनेकदा रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा बंद असते किंवा चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा यादी असते. उपचार जलद गतीने व्हावेत यासाठी नागरिकांना नाइलाजास्तव खासगी केंद्रामधून चाचणी करावी लागते; मात्र जी चाचणी महापालिकेच्या रुग्णालयात हजार ते १२०० रुपयांत होते, त्याच चाचणीसाठी खासगी सीटी स्कॅन केंद्रांवर चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांत नवीन सीटी स्कॅन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि सवलतीच्या दरात योग्य उपचार मिळेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.