अग्निशमन भरतीत महिलांसाठी किमान उंचीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निशमन भरतीत महिलांसाठी किमान उंचीत वाढ
अग्निशमन भरतीत महिलांसाठी किमान उंचीत वाढ

अग्निशमन भरतीत महिलांसाठी किमान उंचीत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई महापालिका अग्निशमन विभागामध्ये मोठी भरती केली जात आहे. पालिकेने या विभागातील भरतीची जाहिरातही नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात महिला प्रवर्गासाठी उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची वाढ करण्यात आली आहे. यामुळे महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अग्निशमन दलाच्या इतिहासातील मोठ्या भरतींपैकी ही एक भरती प्रक्रिया आहे. थेट मुलाखतीने उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. महिला प्रवर्गातील शारीरिक मोजमाप अटी अन्यायकारक आहेत, तरी त्यात सुधारणा करावी, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.
मुंबई महापालिका अग्निशमन विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये महिला प्रवर्गातील शारीरिक मोजमाप अट बदलून त्यात वाढ करण्यात आली आहे. महिला प्रवर्गासाठी किमान उंचीची अट १५७ सेमीवरून वाढवत १६२ सेमीपर्यंत केली आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर आणि राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अॅकॅडमी मुंबई येथे सहा महिने कालावधीचे अग्निशमन प्रशिक्षण दिले जाते. त्यात महिला प्रवर्गासाठी शारीरिक मोजमाप किमान १५७ सेमी उंची आवश्यक असते. मुंबई महापालिका अग्निशमन विभागाने नोकरभरती वेळेस महिलांसाठी शारीरिक मोजमाप किमान १६२ सेमी अशी अटी दिले आहे. ही अट महिलांना प्रवर्गासाठी अन्यायकारक असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते यशवंत खिलारी यांनी थेट महिला आयोगाला पत्र लिहून दाद मागितली आहे.
...
पुरुषांच्या किमान उंचीतही वाढ
अभय अभियान ट्रस्टच्या संचालिका कविता सांगरूळकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, महिला अग्निशामकांची १५७ सेंटिमीटर असलेली उंची प्रशासनाला कमी वाटू लागली. म्हणून त्यांनी त्याची मर्यादा १६२ पर्यंत वाढवली. पुरुष अग्निशामकाच्या उंचीची अर्हता १६५ सेंटिमीटरऐवजी किमान १७२ सेंटिमीटर करण्यात आली आहे. म्हणजे तब्बल ७ सेंटिमीटरने त्यात वाढ केली आहे. माहिती अधिकारात माहिती घेतली असता, १७२ सेंटिमीटर उंचीमुळे विमोचन (रेस्क्यू) कार्यात मदत होते; असे कारण दिले आहे. १६५ सेंटिमीटर उंची असलेला पुरुष अग्निशामक विमोचन कार्य योग्य रीतीने करू शकत नाही, तर मग १६२ सेंटिमीटर उंची असलेली महिला कसे काय करू शकेल, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
...
विनंती आणि इशारा
कित्येक तरुण- तरुणींना नियमबाह्य अटीमुळे या नोकरीला मुकावे लागत आहे. यामुळे उमेदवारांच्या उंचीची अट इतर अग्निशमन सेवांप्रमाणेच ठेवण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे कविता सांगरूळकर यांनी सांगितले. सरकारने दखल न घेतल्यास न घेतल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
..........
मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेत हा बदल पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वी या नियमानुसार दोनदा भरती प्रक्रिया झालेली आहे. यात कुणावरही अन्याय करण्याचा हेतू नाही. पुढील भरती प्रक्रियेत उंचीची मर्यादा कमी करण्याचा प्रयत्न करू.
- संजय मांजरेकर, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल
.........