आयुक्त चहल आज ईडी कार्यालयात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त चहल 
आज ईडी कार्यालयात?
आयुक्त चहल आज ईडी कार्यालयात?

आयुक्त चहल आज ईडी कार्यालयात?

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत समन्स बजावले आहे. आतापर्यंत ईडीचे समन्स स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आयुक्त चहल यांनी आपले मौन सोडले असून आपण ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चहल सोमवारी ईडी कार्यालयात हजर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळात मुंबईतील कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत ठाकरे सरकारने घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन आयुक्त चहल यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. याविरोधात सोमय्या यांनी आझाद मैदान आणि मरिन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास आता ईडीमार्फत सुरू असून ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कोविड काळातील कामे वगळता मुंबई महापालिकेच्या इतर कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच कॅगला दिले होते. राज्य सरकारनेही रस्ते आणि इतर कामांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर काही दिवसांनी ईडीने आयुक्त चहल यांना समन्स बजावले. यासंदर्भात ईडीने चहल यांना १६ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे कळते.
...
नातेवाईकांना मोठी कंत्राटे
कोविडच्या काळात मुंबईत १२ हजार कोटींहून अधिक खर्चाची कामे झाली आहेत. कोविड काळात शिवसेना नेते, पालिका अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना मोठी कंत्राटे दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पालिकेचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना मोठी कंत्राटे देण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
...
राजुल पटेल यांच्यावरक आरोप
कोविड काळातील घोटाळ्यात आता आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या राजुल पटेल यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनीही त्यांच्या एका जवळच्या मित्राला कोट्यवधी रुपयांचे कंत्राट मिळवून दिले, असा राजुल पटेल यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी संपूर्ण कागदपत्रांसह लाच लुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई महापालिका दक्षता यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.
...