टाटा मल्टीकॅप फंड बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा मल्टीकॅप फंड बाजारात
टाटा मल्टीकॅप फंड बाजारात

टाटा मल्टीकॅप फंड बाजारात

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : टाटा अॅसेट मॅनेजमेंटने टाटा मल्टी कॅप हा म्युच्युअल फंड बाजारात आणला असून याद्वारे नफा मिळवण्याच्या विविध टप्प्यांत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होईल. हा एनएफओ १६ ते ३० जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असून किमान पाच हजार रुपये व त्यानंतर त्यापुढे कितीही गुंतवणूक या म्युच्युअल फंडात करता येईल. या फंडामार्फत लार्जकॅप (मोठे शेअर), मिडकॅप (मध्यम आकाराचे शेअर) व स्मॉल कॅप (छोटे शेअर) अशा विविध प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाईल, अशी माहिती टाटा अॅसेट मॅनेजमेंटचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर राहुल सिंह यांनी दिली.

नफा मिळवण्याच्या विविध टप्प्यांत असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे स्थैर्य आणि चांगल्या संधी यांचा समतोल साधता येईल, असेही ते म्हणाले. स्थिर गतीने वाढणाऱ्या कंपन्या, नफा चक्रात बदल झाल्यामुळे अचानक फायदा झालेल्या कंपन्या तसेच प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडलेल्या कंपन्या अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाईल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा येत्या पाच वर्षांत होणार असलेल्या विकासाचा लाभ या फंडाद्वारे मिळेल, असेही राहुल सिंह यांनी सांगितले.