नाशिकमध्ये २८ जानेवारीपासून अ.भा. मराठी मुस्लिम साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकमध्ये २८ जानेवारीपासून
अ.भा. मराठी मुस्लिम साहित्य संमेलन
नाशिकमध्ये २८ जानेवारीपासून अ.भा. मराठी मुस्लिम साहित्य संमेलन

नाशिकमध्ये २८ जानेवारीपासून अ.भा. मराठी मुस्लिम साहित्य संमेलन

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेकडून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २८ आणि २९ जानेवारीदरम्यान नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून उद्‍घाटक म्हणून ‘द वायर’चे संपादक अल्फा खानम शेरवानी उपस्थित राहणार आहेत, तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे हेदेखील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये ‘मुस्लिम मराठी साहित्य चळवळीतील तीन दशके; साहित्य सांस्कृतिक व सामाजिक अन्वयार्थ’, ‘आम्ही भारताचे लोक’, ‘वर्तमान स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यातील सामाजिक सांस्कृतिक वेध’, ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुस्लिम प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’, ‘फातीमाबीच्या लेकींचे कवी संमेलन’ आदी विषयावर परिसंवाद होईल, तर अखेरच्या दिवशी बहुभाषिक कविसंमेलन आणि मुशायरा होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.