Mon, Jan 30, 2023

इंडिया आर्ट फेस्टिव्हलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंडिया आर्ट फेस्टिव्हलला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on : 19 January 2023, 4:17 am
मुंबई, ता. १९ : अकराव्या इंडिया आर्ट फेस्टिव्हलला आज मुंबईतील नेहरू सेंटर वरळी येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये देशभरातील ५५० चित्र-शिल्पकार एकत्र आले असल्याने त्यांच्या चित्रकृती पाहण्यासाठी पहिल्या दिवशी कलाकार कला शाखेचे विद्यार्थी, कला संग्राहक, कला ग्राहक, कलोपासक, कला रसिक आणि प्रेक्षकांनी मोठी हजेरी लावत अनेक कलाकृतीचा आनंद लुटला.
या फेस्टिव्हलमध्ये १५० हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध विषयांवरील आणि निसर्ग, समाज आदींचे दर्शन घडवणारे तसेच कल्पनांना आकार देऊन विचार करायला लावणाऱ्या तब्बल ५००० हून अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. देशभरातील सुमारे ४० शहरांमधील ३०० स्वतंत्र कलाकार सहभागी झाले आहेत. हा फेस्टिव्हल २२ जानेवारीपर्यंत चालणार आहे.