स्टिरॉईडची बेकायदा विक्री करणारास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टिरॉईडची बेकायदा विक्री करणारास अटक
स्टिरॉईडची बेकायदा विक्री करणारास अटक

स्टिरॉईडची बेकायदा विक्री करणारास अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत शरीरसौष्ठवासाठी स्टिरॉईड इंजेक्शन व इतर औषधांची बेकायदा विक्री होत असल्याच्या माहितीवरून कारवाई केली. भगवती रुग्णालय बोरिवली या ठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सापळा रचून एका इसमास रंगेहात पकडले.
औषधे ही कोशेर फार्मास्युटिकल यांच्या आनंद भवन अपार्टमेंट एस. व्ही. रोड बोरिवली (प.) या जागेतून पुरवठा करण्यात आल्याच्या माहितीवरून कारवाई पथकाने तेथे छापा टाकला. या जागेत मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. तो साठा जप्त करण्यात आला.