टेट परीक्षेच्या नोंदणीत अडचणी

टेट परीक्षेच्या नोंदणीत अडचणी

Published on

मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) परीक्षेच्या नोंदणीसाठी उमेदवारांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकदा भरलेला अर्ज दुसऱ्यांदा दुरुस्त करण्याची कोणतीही मुभा त्यासाठीच्या संकेतस्थळावर नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.
विद्यार्थ्यांची सही निळ्या अक्षरात असल्यास हे अर्ज बाद होत आहेत. त्यामुळे या अर्जासोबत भरलेले शुल्कही वाया जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली असून त्यामध्ये अर्ज ऑनलाईन दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ८ फेब्रुवारीपर्यंत टेट परीक्षेच्या नोंदणीसाठीची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांनी दिली. विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज दुरुस्त करता येतील का, यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादरीकरणासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार उमेदवार आता नाॅन क्रिमिलेअर, महिला आरक्षण प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ३१ मार्चपर्यंत सादर करू शकतात. परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुभा
उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, महिला आरक्षण प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे मिळण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सीटीईटीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हा निकाल अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीटीईटीच्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी त्यांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र संबंधित उमेदवारांचा सीटीईटीचा निकाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.