मुश्रीफांच्या तिन्ही मुलांची अटकपूर्व जामिनासाठी धाव

मुश्रीफांच्या तिन्ही मुलांची अटकपूर्व जामिनासाठी धाव

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : मनीलॉण्डरिंग प्रकरणात गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी मुंबईतील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कथित गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांची मुले नाविद, आबिद आणि साजीद यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आमच्यावर राजकीय हेतूने आरोप आणि अटकेबाबत धमकावण्यात येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे. विशेष न्या. एम. जी. देशपांडे यांच्यासमोर बुधवारी याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने ईडीला १६ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित व्यवहारांबाबत ईडीने चौकशी सुरू केली आहे. या बँकेच्या कामकाजात मुश्रीफ यांच्या मुलांचा संबंध आहे, असा दावा ईडीने केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार हसन मुश्रीफ यांच्यावर जाहीर आरोप केले आहेत. त्यामध्ये तथ्य नसून न्यायालयाने संरक्षण द्यावे, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.