बँक ऑफ महाराष्ट्र संपाला मोठा प्रतिसाद

बँक ऑफ महाराष्ट्र संपाला मोठा प्रतिसाद

मुंबई, ता. ९ ः बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजच्या संपात २१०० पेक्षा जास्त शाखांमधील तेरा हजारांहूनही जास्त कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. बँकेतील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार हा संप पुकारण्यात आला आहे, तो उद्यादेखील सुरू राहील. आजच्या या संपामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये कोणतेही कामकाज झाले नाही. संपाचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रातच झाला.

मुंबईत संपकरी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास सर्व संघटनांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ कामगार नेते देविदास तुळजापूरकर यांनी बँक व्यवसथापनाच्या दडपशाहीबद्दल निषेध केला. संपाच्या दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीतील बँकेच्या झोनल ऑफिससमोर निदर्शने केली जातील. बँक व्यवस्थापनाने आपले आडमुठे धोरण असेच चालू ठेवले, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. असेच मेळावे, निदर्शने राज्यात सर्वत्र आयोजित करण्यात आले होते. आज संपकरी कर्मचाऱ्यांनी गांधीवादी मार्गाचा अवलंब करत दुपारी विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com