नवीन ''एसटीपी प्लांट''साठी अजून प्रतीक्षा : अर्थसंकल्पात भरीव तरतूद ; आणखी ४-५ वर्षांचा कालावधी लागणार; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन ''एसटीपी प्लांट''साठी अजून प्रतीक्षा : अर्थसंकल्पात भरीव तरतूद ; आणखी ४-५ वर्षांचा कालावधी लागणार;
नवीन ''एसटीपी प्लांट''साठी अजून प्रतीक्षा : अर्थसंकल्पात भरीव तरतूद ; आणखी ४-५ वर्षांचा कालावधी लागणार;

नवीन ''एसटीपी प्लांट''साठी अजून प्रतीक्षा : अर्थसंकल्पात भरीव तरतूद ; आणखी ४-५ वर्षांचा कालावधी लागणार;

sakal_logo
By

नवीन ‘एसटीपी प्लांट’साठी अजून प्रतीक्षा
अर्थसंकल्पात भरीव तरतूद; तरी अजून चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : शहरातून निघणारे मलनिःसारण वाहिन्यांतील पाणी थेट समुद्रात जाऊन होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र (एसटीपी प्लांट) उभारण्यात येत आहेत. पालिकेतर्फे नव्याने सात मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येत आहेत. नवीन अर्थसंकल्पात त्यासाठी सुमारे २७९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी त्यांचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षे लागणार आहेत.
मुंबई मलनि:सारण प्रकल्प खात्यांतर्गत मलजल प्रक्रिया केंद्राचा आराखडा तयार करून बांधणी, मालमत्ता पुनर्स्थापन आणि प्रचालन व परीरक्षणाची कामे धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप, वांद्रे आणि वरळी अशा सात ठिकाणी देण्यात आली आहेत. सातही मलजल प्रक्रिया केंद्राची क्षमता २४६४ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी आहे. त्यांपैकी ५० टक्के म्हणजेच १२३३ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या पाण्यावर तृतीयस्तरीय प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्त कामासाठी करण्याचे प्रस्तावित आहे.
अस्तित्वात असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्रांचे प्रचालन व परीरक्षण करण्यात येणार आहे. त्यासह नवीन सात मलजल प्रक्रिया केंद्रांचा आराखडा तयार करून बांधकाम आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्या पुढील १५ वर्षे नवीन मलजल प्रक्रिया केंद्राचे प्रचालन व परीरक्षण करणे, आवश्यक यंत्र-संयंत्रे बदलणे, निर्माण होणाऱ्या गाळावर प्रक्रिया करणे, गाळापासून निर्माण होणाऱ्या जैव वायूपासून ऊर्जानिर्मिती करणे इत्यादी कामांचा समावेश प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे.

मलजल प्रक्रिया केंद्रासाठी एकूण २७,३०९.८३ कोटी रुपये खर्च केला जात आहे. २०२३-२४ मध्ये एकूण २७९२ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे. त्यातील काही केंद्रे २०२६ मध्ये; तर काही २०२८ मध्ये पूर्ण होणार आहेत. वरील मलजल प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण व्हायला वेळ लागणार असल्याने त्याव्यतिरिक्त मलजल बोगदा कामालाही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामध्ये बोरिवली ते मालाड आणि गोरेगाव ते मालाड मलजल बोगदा तयार करण्यात येत असून घाटकोपरमधील आंतरप्रवाही उदंचन केंद्र अद्ययावत करण्याचे कामही केले जात आहे.

मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत २०२२-२३ च्या सुधारित अंदाजात २०२२.०६ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ३५६६.७८ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित आहे.

नवीन मलजल प्रक्रिया केंद्र
केंद्र क्षमता (दशलक्ष लिटर प्रतिदिन) एकूण खर्च पूर्ण होणार
- धारावी ४१८ ४,७७६.५६ ४.७.२७
- मालाड ४५४ ६,६००.३४ ४.७.२८
- वर्सोवा १८० १,६५८.५१ ४.७.२६
- घाटकोपर ३३७ २,६३६.८२ ४.७.२६
- भांडुप २१५ १,२१३.११ २२.८.२६
- वांद्रे ३६९ ४,४२९.३१ ४.७.२७
- वरळी ५०० ५,९९५.१८ ४.७.२७
एकूण २४६४ २७,३०९.८३
(आकडे कोटीत)

मलजल बोगदे आणि उदंचन केंद्राची कामे
१ वर्सोवा मलजल बोगदा (जुने वर्सोवा उदंचन केंद्र ते नवीन वर्सोवा आंतरप्रवाही उदंचन केंद्र)
- प्रकल्पाची मूळ किंमत ः १०९.९५ कोटी
- प्रकल्पाची पूर्तता ः मे २०२३

२ बापट नाला व सफेद पूल नाला ते प्रस्तावित धारावी मलजल केंद्रादरम्यान मलजल बोगदा
- प्रकल्पाची मूळ किंमत ः ४३४.८४ कोटी
- प्रकल्पाची पूर्तात ः सप्टेंबर २०१५

३. नवीन वर्सोवा आंतरप्रवाही उदंचन केंद्राची उभारणी
- प्रकल्पाची मूळ किंमत ः १९९.८१ कोटी
- प्रकल्पाची पूर्तता ः जून २०२३

४. नवीन मालाड आंतरप्रवाही उदंचन केंद्राची उभारणी
- प्रकल्पाची मूळ किंमत ः ४६४.७२ कोटी
- प्रकल्प पूर्ती ः ऑक्टोबर २०२५

५. भांडुप आंतरप्रवाही उदंचन केंद्र अद्ययावत करणे
- प्रकल्पाची मूळ किंमत ः १०८.८१
- प्रकल्पाची पूर्तता ः जुलै २०२४