Tue, March 28, 2023

आठवले करणार धम्म पदयात्रेचे स्वागत
आठवले करणार धम्म पदयात्रेचे स्वागत
Published on : 14 February 2023, 3:29 am
मुंबई, ता. १४ : तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूंच्या दर्शनाचा लाभ राज्यातील बौद्ध उपासकांना होण्यासाठी थायलंडमधून आलेल्या बौद्ध भन्ते यांनी परभणी ते चैत्यभूमी अशी ‘धम्म पदयात्रा’ काढली आहे. या अस्थिधातूंचे दर्शन घेण्यासाठी आणि पूज्य भिक्खू संघाच्या स्वागतासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. या पदयात्रेचा समारोप १५ फेब्रुवारीला मुंबईत चैत्यभूमी येथे होणार आहे. पदयात्रेत थायलंडमधून आणलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूंचे दर्शन मुंबईकरांना होणार आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी जनतेने धम्म पदयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे.