हृदयाभोवती जमा झाले ४०० मिली कोलेस्टेरॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयाभोवती जमा झाले ४०० मिली कोलेस्टेरॉल
हृदयाभोवती जमा झाले ४०० मिली कोलेस्टेरॉल

हृदयाभोवती जमा झाले ४०० मिली कोलेस्टेरॉल

sakal_logo
By

पेरीकार्डियल इफ्यूजनवर मात
हृदयाभोवती जमले हाोते ४०० मिली कोलेस्टेरॉल
मुंबई, ता. २१ : रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागतो. कोलेस्टेरॉल आरोग्याला नेहमीच घातक असते. त्याबाबत वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे ठरतात. हृदयाभोवती तब्बल ४०० मिली कोलेस्टेरॉल जमा झालेल्या मुंबईतील एका ५५ वर्षीय पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. चायलॉस पेरीकार्डियल इफ्यूजनने पीडित या रुग्णावर खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले.
संबंधित रुग्णाला मधुमेहामुळे श्वासोच्छवासाचा त्रास आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत त्याच्यात पेरिकार्डियल इफ्यूजनचे निदान झाले. अशा स्थितीत हृदयाभोवती द्रव साचतो. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्याकडे त्याला पाठवण्यात आले. डॉ. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्याच्यावर उपचार केले. रुग्णाच्या पेरिकार्डियल पोकळीमध्ये एक बारीक कॅथेटर ठेवण्यात आले आणि ४०० मिली चरबीयुक्त द्रव काढून टाकण्यात आला. चायलॉस पेरीकार्डियल इफ्यूजन हा एक दुर्मिळ रोग आहे. तो समजून घेण्यासाठी एमआर लिम्फॅन्जिओग्राफी करण्यात आली. लिम्फॅटिक नलिकांपैकी एक असामान्य गळतीमुळे पेरिकार्डियल जागेत निचरा होत होता ज्यामुळे  इफ्यूजन होते. मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी (एमआयसीएस) म्हणजेच कमीत कमी चिरा घेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. जेणेकरून रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लवकर बरा होईल.
पेरिकार्डियल इफ्यूजन म्हणजे हृदयाभोवती द्रव साचणे. इतर कारणांमध्ये व्हायरल इन्फेक्शन, लिम्फोमासारखा रक्त कर्करोग, कर्करोगाचा त्या ठिकाणी प्रसार (मेटास्टेसेस) आदींचा समावेश होतो. रुग्णाची रुग्णालयात टुडी इको चाचणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत रुग्णाच्या हृदयात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले.
– डॉ. प्रवीण कुलकर्णी, हृदयरोगतज्ज्ञ

पेरीकार्डियल इफ्यूजन लक्षण
छातीत दुखणे किंवा दाब
श्वासोच्छवासाचा त्रास
झोपेत असताना श्वास घेताना अस्वस्थता
कमी रक्तदाब

पेरीकार्डियल इफ्यूजन कारण
बदलती जीवनशैली आणि कामाच्या तणावामुळे बहुतेक लोक त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. बहुतेकदा असे दिसून येते की लोक वेळेवर अन्न खात नाहीत. ही समस्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे उद्भवते. हळूहळू त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी मोठी समस्या उद्भवू शकते.