खटला जलदतीने होण्यासाठी सूरज पंचोलीचा न्यायालयात अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खटला जलदतीने होण्यासाठी
सूरज पंचोलीचा न्यायालयात अर्ज
खटला जलदतीने होण्यासाठी सूरज पंचोलीचा न्यायालयात अर्ज

खटला जलदतीने होण्यासाठी सूरज पंचोलीचा न्यायालयात अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेला अभिनेता सूरज पंचोलीने मुंबई विशेष न्यायालयात खटला जलदगतीने होण्यासाठी अर्ज केला आहे.
सन २०१३ मध्ये जियाने तिच्या जुहू येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार सीबीआयने दाखल केली. जिया आणि सूरज यांच्यामध्ये प्रेम होते आणि त्यातून आलेल्या नैराश्याने तिने आत्महत्या केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. तिच्या आईने या मृत्यूस सूरज जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सध्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला सुरू आहे; तर दुसरीकडे जियाच्या आईनेही न्यायालयात अर्ज करून अधिक तपास करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सूरजने न्यायालयात हजेरी लावली. तसेच शीघ्रगतीने खटला पूर्ण करावा अशी मागणी केली आहे.
सूरजचे वडील अभिनेता आदित्य पंचोली यांचा या खटल्यात साक्षीदार म्हणून उल्लेख करण्यात आला होता; मात्र सीबीआयने नंतर त्याचे नाव साक्षीदार यादीतून वगळले. या साक्षीमुळे अभियोग पक्षाची बाजू कमकुवत होऊ शकते या शक्यतेने हा निर्णय घेण्यात आला होता.