विविध मागण्यांसाठी कोविड योद्धांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध मागण्यांसाठी
कोविड योद्धांचे आंदोलन
विविध मागण्यांसाठी कोविड योद्धांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी कोविड योद्धांचे आंदोलन

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : कोरोनाच्या जागतिक महामारीत अनेक कोविड योद्ध्यांनी योगदान दिले; मात्र महामारी ओसरल्यावर राज्यभरातील कोविड योद्ध्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आले. त्यांच्या जागेवर आता नव्याने भरती केली जात आहे. त्यामुळे कोरोना काळात योगदान दिलेल्या योद्ध्यांना नोकरीत नियमित करा, तसेच कंत्राटदाराकडून नोकरभरती बंद करा, या मागण्यांसाठी राज्यभरातील कोरोना योद्धे आझाद मैदानात एकवटले.
म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या वतीने आयोजित आंदोलनात राज्यभरातील दोन हजारांहून अधिक कोविड योद्ध्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यभरात युनियनच्या वतीने दौरा करत कोविड योद्ध्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यात प्रामुख्याने या कोविड योद्ध्यांना वेतन मिळालेले नाही, शिवाय भत्ताही नाही. या योद्ध्यांना तडकाफडकी सेवेतून काढून टाकण्यात येत आहे. कंत्राटदार आणि व्यवस्थापनामुळे आमचा बळी जात आहे. याखेरीज शासनाने जाहीर केलेला बोनसही आम्हाला मिळालेला नाही, असे युनियनचे उपाध्यक्ष शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.
---
प्रमुख मागण्या
- कोविड योद्ध्यांना नोकरीत नियमित करा
- कोविड भत्ता व बोनस त्वरित द्या
- सैनिकांचा दर्जा द्या
- कंत्राटदारांतर्फे नोकरभरती बंद करा
- आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठी तरतूद करा