नाट्य परीक्षण मंडळाचा साहित्यिकांकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य परीक्षण मंडळाचा साहित्यिकांकडून निषेध
नाट्य परीक्षण मंडळाचा साहित्यिकांकडून निषेध

नाट्य परीक्षण मंडळाचा साहित्यिकांकडून निषेध

sakal_logo
By

नाट्य परीक्षण मंडळाचा
साहित्यिकांकडून निषेध
मुंबई ः दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या ‘जाहीरनामा’ या संग्रहातील ‘शिगवाला’ या गाजलेल्या कवितेतील ओळी जातीवाचक आहेत, म्हणून त्या वगळण्याचा सल्ला एका नवोदित नाटककाराला शासनाच्या नाट्य परीक्षण मंडळाने दिला आहे. या प्रकाराचा लोकसांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, जनवादी लेखक संघ व प्रगतीशील लेखक संघाने निषेध केला आहे. पुण्यातील नवोदित नाटककार विजय गायकवाड यांनी ‘कशाला मागं सरायचं’ हे नाटक लिहिले आहे. या नाटकात त्यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या ‘शिगवाला’ या कवितेतील ओळींचा आधार घेतला आहे, पण नाट्य परीक्षण मंडळाने या ओळी वगळण्याचा सल्ला गायकवाड यांना दिला आहे. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याचे सांगत साहित्यिकांनी निषेध केला.