Mon, March 27, 2023

दोन कोळसा खाणी गुजरात मिनरलकडे
दोन कोळसा खाणी गुजरात मिनरलकडे
Published on : 19 March 2023, 5:54 am
मुंबई, ता. १९ ः ओडिशातील कोळशाच्या दोन खाणींसाठी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे या खाणी त्यांना मिळतील.
कोळसा मंत्रालयाने कोळसा ब्लॉकचे लिलाव केले होते. त्यात ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील बुरापहार ब्लॉक मध्ये ५४.८ कोटी टन कोळसा आहे. अंगुळ जिल्ह्यातील बैतरामी ब्लॉक मध्ये ११५ कोटी टन कोळसा आहे. या कोळसा खाणी मिळणे ही जीएमडीसी साठी महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे देशाच्या जादा ऊर्जा मागणीसाठी इंधनही मिळेल, असे जीएमडीसी चे व्यवस्थापकीय संचालक रूपवंत सिंह म्हणाले. ह्या कोळसा खाणी पूर्ण क्षमतेने विकसित करताना सुरक्षितता आणि पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले.