बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनला दरवर्षी तीनलाख युनिट कार्बन क्रेडिट

बिगब्लॉक कन्स्ट्रक्शनला दरवर्षी तीनलाख युनिट कार्बन क्रेडिट

मुंबई, ता. २२ : इमारत बांधकामात विटांऐवजी वापरले जाणारे सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीचा वाडा (जि. पालघर) येथील प्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यातून त्यांना दर वर्षी एक लाख युनिट कार्बन क्रेडिट मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या या कंपनीच्या पत्रकात वरील माहिती देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक हरित इमारतींच्या बांधकामात या ब्लॉकचा वापर केला जातो. या प्रकल्पासाठी कंपनी ६५ कोटी रुपये खर्च करणार असून राज्य सरकारकडून त्यांना त्यापैकी ६० टक्के अनुदान मिळणार आहे. लवकरच या कंपनीतून दर वर्षी पाच लाख घनमीटर एवढे ब्लॉकचे उत्पादन सुरू होणार असून विस्तार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीची क्षमता दरवर्षी १३.७५ लाख घनमीटर एवढे ब्लॉक निर्माण करण्याची होईल. त्यातून कंपनीला दोनशे कोटी रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर कंपनीला अडीच ते तीन लाख युनिट कार्बन क्रेडिट मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष नारायण साबू यांनी दिली. थायलंडच्या एस.सी.जी. ग्रुपशी सहकार्य करून कंपनी अहमदाबादजवळ वर्षाला तीन लाख घनमीटर ब्लॉक उत्पादनाचा प्रकल्पही उभारत आहे.

------
नऊमाहीत २४.६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा
डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये बिग ब्लॉक कन्स्ट्रक्शन कंपनीला २४.६७ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. यातील वार्षिक वाढ १८६ टक्के आहे, याच कालावधीसाठी त्यांचे एकूण उत्पन्न १५३ कोटी असून यातील वार्षिक वाढ २५ टक्के आहे. मार्च २०२२ अखेरीस कंपनीचा निव्वळ नफा १६ कोटी रुपये होता. एक युनिट कार्बन क्रेडिट ज्यांच्याकडे असेल त्यांना एक टन कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जनाची परवानगी मिळते. सामान्यतः अशा कार्बन क्रेडिटची विक्रीदेखील करण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com