Tue, May 30, 2023

ओळखपत्र आधार जोडण्यात मुदतवाढ
ओळखपत्र आधार जोडण्यात मुदतवाढ
Published on : 23 March 2023, 12:26 pm
नवी दिल्ली, ता. २३ ः मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड हे एकत्र जोडण्याची (लिंक) मुदत केंद्र सरकारने एक वर्षासाठी वाढवली आहे. आता हे काम ३१ मार्च २०२४ पर्यंत करता येईल. आधी ही मुदत १ एप्रिल २०२३ पर्यंत होती.
आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने किंवा एसएमएस पाठवूनही करता येते; मात्र ते लिंक करण्याची बाब ऐच्छिक असून सक्तीची नाही, असे सरकारने म्हटले आहे. ही दोन ओळखपत्रे लिंक केल्यामुळे एकाच मतदाराचे नाव दोन मतदारसंघांत नोंदवले आहे का किंवा एकाच मतदारसंघात दोन ठिकाणी नोंदवले आहे का, हे तपासणे सोपे होईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.