घनकचरा व्यवस्थापनेसाठी कॉम्पॅक्टर गाडया व बंदिस्त कंटेनर्स ची व्यवस्था: शाळा,इस्पितळा मध्ये व्यवस्था करणार

घनकचरा व्यवस्थापनेसाठी कॉम्पॅक्टर गाडया व बंदिस्त कंटेनर्स ची व्यवस्था: शाळा,इस्पितळा मध्ये व्यवस्था करणार

घनकचरा व्यवस्थापनासाठी
कॉम्पॅक्टर आणि बंदिस्त कंटेनर
पालिकेतर्फे शाळा-रुग्णालयांतही कचरापेटीची व्यवस्था

मुंबई, ता. २२ ः घनकचरा संकलित करून वाहून नेण्यासाठी संयुक्तिक अशा कॉम्पॅक्टर गाड्या, बंदिस्त कंटेनर आणि कचरापेट्या महापालिकेने वापरात आणल्या आहेत. महापालिकेने खरेदी केलेल्या आणि भाड्याने घेतलेल्या कॉम्पॅक्टरमध्ये २४० लिटर क्षमतेच्या बंदिस्त कचरापेट्या उचलण्याची व्यवस्था आहे. सदर कचरापेट्या कॉम्पॅक्टरद्वारे सहज उचलता आणि रिकाम्याही करता येतात.
महापालिकेच्या शाळा, रुग्णालये आणि आस्थापना विभाग इत्यादी खात्यांमध्ये कॉम्पॅक्टरद्वारे उचलण्यात येणाऱ्या कचरापेट्या बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रोज जमा केला जाणारा कचरा तात्पुरत्या स्वरूपात संकलन करण्याकरिता कचरापेट्यांची नव्याने मागणी होत आहे. त्यानुसार २४० लिटर क्षमतेच्या बंदिस्त कचरापेट्या दोन वर्षांच्या कालावधीकरिता गरजेनुसार खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत.
मे. नीलकमल लि., मे. अॅरिस्ट्रोप्लास्ट प्रॉडक्टस् प्रा. लि आणि मे. विमप्लास्ट लि. यांच्या निविदा प्रतिसादात्मक आढळून आल्या. नीलकमल लि. कंपनीचा देकार पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा १.१९ टक्क्यांनी कमी आहे. त्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केलेली असून त्यांनी महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संलग्न असलेली विविध कामे यापूर्वी योग्यरीत्या पार पाडलेली असल्याने संबंधित कामासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

दोन वर्षे कंत्राट
कंत्राटदाराला पालिकेच्या २४ विभागांमध्ये कॉम्पॅक्टर गाड्या, बंदिस्त कंटेनर्स आणि कचरापेट्यांचा पुरवठा करावा लागेल. कंत्राटदाराला मागणीनंतर तीन दिवसांत पुरवठा करावा लागणार आहे. पुढील दोन वर्षे कंत्राटाचा कालावधी असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com