ओशिवारा विभाग उजळणार

ओशिवारा विभाग उजळणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : के पश्चिम प्रभाग अर्थात अंधेरी पश्चिम व ओशिवारा भागात २०१३ ते १७ या कालावधीत एकूण ११४ हायमास्ट उभारण्यात आले होते. त्यातील अनेक हायमास्ट धोकादायक स्थितीत आहेत. काही हायमास्ट बंद अवस्थेतदेखील आहेत. या सर्व हायमास्टची दुरुस्ती, डागडुजी करून हा विभाग उजळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
के पश्चिम प्रभागातील ११४ हायमास्टमध्ये वारंवार होणारे बिघाड तसेच दुभाजकावर असणारे काही हायमास्ट धोकादायक स्थितीत आहेत. त्याअनुषंगाने सहायक आयुक्त यांनी येथील हायमास्टची दुरुस्ती तसेच त्‍यांची तपासणी करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार या विभागातील अभियंत्यांनी भेट देत सर्व हायमास्टची तापसणी केली. यामध्ये ५४ हायमास्ट सुस्थितीत कार्यरत असून उर्वरित ६० हायमास्टची दुरुस्ती तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व ११४ हायमास्टच्या फाऊंडेशनची चाचणी करणे गरजेचे असल्याचे समजते. त्यानुसार कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

यांना मिळाले काम
हायमास्‍टच्‍या कामासाठी पालिकेने ई-निविदा मागवल्या. त्याला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यापैकी मे. चैत्रा इलेक्ट्रिकल्स ॲण्ड इंजिनीयरिग कंपनीचा लघुत्तम दर असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. यावर ६९,१५,९९८ खर्च करण्यात येणार असून काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन महिने असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com