विधीच्या सीईटीला विद्यार्थ्यांची दांडी

विधीच्या सीईटीला विद्यार्थ्यांची दांडी

मुंबई, ता. २ : राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तीन वर्षांच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज सीईटी परीक्षा राज्यभरात पार पडली. या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७ हजार ९८० विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती राज्य सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरून समोर आले आहे.
राज्यात असलेल्या लॉ तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. मंगळवारी तीन सत्रांत झालेली सीईटी सकाळच्या सत्रात १०४, दुपारच्या सत्रात ११४ आणि सायंकाळच्या सत्रात १०८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. तिन्ही सत्रांसाठी राज्यात ४६ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३८ हजार ४३१ विद्यार्थी उपस्थित होते. तिन्ही सत्रांची मिळून ८२.७९ टक्के उपस्थिती होती; तर ७ हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले होते, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com