प्रवाशाला मारहाण करणाऱ्या पाचजणांना सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशाला मारहाण करणाऱ्या पाचजणांना सक्तमजुरी
प्रवाशाला मारहाण करणाऱ्या पाचजणांना सक्तमजुरी

प्रवाशाला मारहाण करणाऱ्या पाचजणांना सक्तमजुरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : सात वर्षांपूर्वी एका तरुण प्रवाशाला मारहाण करून धावत्या रेल्वेत लुटल्याचा आरोप असलेल्या पाच जणांना मुंबई सत्र न्यायालयाने सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या सहदेव झोरे (२६) हा डिसेंबर २०१६ मध्ये कंपनीच्या कामासाठी पुण्याला गेला होता. तेथून परतत असताना त्याने पनवेल ते सीएसएमटी लोकल रात्री उशिरा मानखुर्दला पकडली. त्याच लोकलमध्ये कुर्ला येथे अन्य चार प्रवासी चढले. नंतर अन्य एक जीटीबी स्थानकात चढला.

वडाळा स्थानकात लोकलमधून उतरण्यासाठी तक्रारदार उठू लागताच यापैकी काही जणांनी झोरे याच्यावर हल्ला केला आणि त्याची बॅग हिसकावून घेतली. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेनही काढली. झोरे याने प्रतिकार केला; मात्र त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे सर्व शिवडी स्थानकात उतरून फरारी झाले. अभियोग पक्षाने या खटल्यात १३ साक्षीदार तपासले. अभियोग पक्षाच्या वतीने अॅड. रमेश सिरोया यांनी बाजू मांडली.