दर्शन आत्महत्याप्रकरणात हस्तक्षेप नाही!

दर्शन आत्महत्याप्रकरणात हस्तक्षेप नाही!

मुंबई, ता. १ : ‘दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात आता चार्टशीट दाखल झाली आहे. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही,’ असे सांगत यापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे केंद्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. दर्शनच्या आत्महत्येप्रकरणी तपास पथक आणि पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच चार्टशीट दाखल केली आहे. त्यानंतर आज आयोगाने दिल्लीत या प्रकरणाची सुनावणी घेतली.

दर्शन सोळंकी याच्या वडिलांनी आपल्या मुलाची आत्महत्या ही जातीय वागणुकीमुळेच झाली आहे. त्यासाठीचा तपास हा एसआयटी आणि पोलिसांकडून झालेला नसल्याचे आयोगापुढे सांगितले; मात्र सर्व बाजू ऐकूण घेतल्यानंतर आयोगाने या प्रकरणात आता चार्टशीट दाखल झाली असल्याने आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. यामुळे या प्रकरणी पुढे सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती आयोगातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, दर्शनच्या वडिलांनी आयोगाने आपली निराशा केल्याची प्रतिक्रिया दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com