पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वाटप पूर्ण

पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वाटप पूर्ण

संजीव भागवत
मुंबई, ता. ६ : नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होण्यास आठवडा बाकी आहे. असे असताना समग्र शिक्षा अभियानाने राज्यातील सर्वच सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये शंभर टक्के पाठ्यपुस्तके पोहोचवली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत.

राज्यातील समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मागील वर्षी शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर सर्व पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचली होती. या वेळी आठवडाभर अगोदर ही पुस्तके पोहोचली आहेत. समग्र शिक्षाच्या माध्यमातून राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या १ कोटी ७ लाख ४७ हजार ७२८ विद्यार्थ्यांना तब्बल ४ कोटी ३७ लाख २१ हजार ९५१ पुस्तके मिळणार आहेत. यावेळी दुसरी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील मराठीसह दहा विविध माध्यमांची आणि एकात्म‍िक व द्व‍िभाषिक पद्धतीची पुस्तके नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यांना वह्याची पाने जोडलेली असल्याने या पुस्तकांचे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही आकर्षण असणार आहे.
--
शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. शाळास्तरावर पुस्तके वेळेपूर्वी पोहोचवण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर नियोजन केल्याने आठवडाभरापूर्वीच आम्हाला शाळांपर्यंत पुस्तके पोहोचवता आली.
- कैलास पगारे, प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान
--
डेपोनिहाय पुस्तकांचे वाटप
डेपो वाटपाची संख्या
पुणे ७१४१३९९
अमरावती ४७४४१४६
औरंगाबाद ५१७१८९९
कोल्हापूर ४५६०१९६
लातूर ४८९५०००
गोरेगाव २४४५२५९
नागपूर ३८८६११९
नाशिक ७१८५८८४
पनवेल ३८४२०१३
एकूण ४३८७१९५१
----
जिल्हानिहाय विद्यार्थी संख्या
जिल्हा विद्यार्थ्यांची संख्या
पुणे ७५६६६३
नाशिक ७४४७८५,
सोलापूर ५१०२०७
नंदूरबार २३२८१९
धुळे २८६१८६
जळगाव ५०३३६१
बुलढाणा २९०१४७
अकोला १६५९९३
वाशिम १३५२५७
अमरावती २६३७६२
वर्धा ९६४३१
नागपूर ३१८९८६
भंडारा १०९५९३
गोंदिया १२५९१६
गडचिरोली ११६१२६
चंद्रपूर १८१९२६
यवतमाळ २९७४३८
नांदेड ४१८६५९
हिंगोली १५१२५६
परभणी २५९८६६
जालना ४९१२०२
औरंगाबाद ७४४७८५
ठाणे ४७०७७६
मुंबई बीएमसी ३५७९५९
मुंबई डीवायडी २५५६१७
रायगड १९२३८०
अहमदनगर ४९६७९५
बीड ३५७३७६
लातूर ३१४३५४
उस्मानाबाद १८६००५
सातारा २६६१८४
रत्नागिरी ११८६११
सिंधुदूर्ग ५८१०२
कोल्हापूर ३७१८००
सांगली २९२९५९
पालघर २८८०७५
एकूण १०७४२७२८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com