माणुसकीच्या तत्वाने मृत्यूनंतर जामीन

माणुसकीच्या तत्वाने मृत्यूनंतर जामीन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : मधुमेहाच्या तीव्र आजाराने जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सत्र न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला. न्यायालयाने माणुसकीच्या तत्त्वाने हा जामीन सहा महिन्यांसाठी मंजूर केला होता.

जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी सुरेश पवार हा वयस्क नागरिक होता. त्याला मधुमेहाच्या आजारासह अन्य आजार होते. तसेच पायाच्या अंगठ्याला जखम झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सरकारी रुग्णालयात व्यवस्थित उपचार होत नसल्यामुळे नियमित वैद्यकीय जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने जामीन अर्जात केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल गायकवाड यांच्यापुढे झालेल्या सुनावणीमध्ये अभियोग पक्षाने जामिनाला विरोध केला होता. तसेच मूळ तक्रारदाराने ९ मे रोजी अर्ज करून जामिनाला विरोध केला होता. त्यानंतर त्याच दिवशी आरोपीचा रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपीवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये १० हून अधिक जणांना फसवल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com