मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी स्वीकारला

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी स्वीकारला

कुलगुरूपदाचा कार्यभार
प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी स्वीकारला
मुंबई, ता. ८ : मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. विद्यापीठाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात प्रा. शिर्के यांचा निरोप समारंभ आणि प्रा. कुलकर्णी यांचा स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यापीठाचे माजी प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध प्राधिकरणांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना प्रा. कुलकर्णी म्हणाले, की मुंबई विद्यापीठाला ज्ञानदानाची उज्ज्वल, ऐतिहासिक आणि समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक वर्षांपासून विद्यापीठाने ज्ञानदानाचा वारसा अविरतपणे जोपासला आहे. ही प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रा. दिगंबर शिर्के यांनी गेले नऊ महिने विद्यापीठात विविध सहकाऱ्यांच्या सहकार्याने केलेल्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. अजय भामरे यांनी विद्यापीठात सेवेची संधी मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com