विशेष भाषेमुळे कार्यालयीन कामात अडचणी

विशेष भाषेमुळे कार्यालयीन कामात अडचणी

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईतील व्‍यावसायिकांसाठी कामाच्‍या ठिकाणी एका विशेष भाषेचा वापर करणे आवश्यक असल्यामुळे अडचणी येत असतात, असा निष्कर्ष लिंक्‍डइन या व्‍यावसायिक नेटवर्क आणि ड्युओलिंगो या भाषा आणि संवादाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी केलेल्या संशोधनातून काढला आहे. त्यासाठी त्यांनी एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे.
विशेष भाषेमुळे कामाच्या ठिकाणी असमानता आणि संधीचे विभाजन होऊ शकते. दहापैकी आठ भारतीय व्‍यावसायिकांचा (८१ टक्‍के) विश्‍वास आहे की, कामाच्‍या ठिकाणी किंवा कार्यालयांत वापरल्‍या जाणाऱ्या विशेष भाषेबाबत चांगली समज असलेले कर्मचारी संघर्ष कराव्‍या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा कामामध्‍ये पुढे जाण्‍यास (पदोन्‍नती, वाढ इत्‍यादी) सक्षम असतात. अधिक चिंताजनक बाब म्‍हणजे ऑनसाइट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्‍या (७४ टक्‍के) तुलनेत रिमोट (८८ टक्‍के) व हायब्रिड (८१ टक्‍के) कर्मचाऱ्यांना विशेष भाषेसंदर्भात संघर्ष करावा लागतो. संशोधनानुसार ८४ टक्‍के मुंबईकर म्‍हणतात, त्‍यांना स्‍वत:हून त्‍यांच्‍या कामाच्‍या ठिकाणी वापरली जाणारी विशेष भाषा समजण्‍यास प्रवृत्त करण्‍यात आले. विशेष भाषेबाबत चांगले ज्ञान असलेले सह-कर्मचारी संघर्ष कराव्‍या लागणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा कामामध्‍ये पुढे जाण्‍यास अधिक सक्षम असल्याचे ८० टक्‍के व्‍यावसायिक मान्‍य करतात.

ंगोंधळात टाकणारी वाक्ये
ही विशेष भाषा भारतीयांना कामाच्‍या ठिकाणी सर्वांत गोंधळात टाकणारी वाटते. यामध्ये ‘कीप मी इन द लूप’ हे वाक्य अव्‍वलस्‍थानी आहे. या वाक्‍याचा अर्थ असा की, ‘एखाद्याला विषयाबाबत माहिती देणे किंवा अपडेटेड ठेवणे’. आणखी गोंधळात टाकणारी वाक्‍ये म्हणजे ‘टेक ऑफलाइन’, ‘विन-विन सिच्‍युएशन’ आणि ‘कोअर कॉम्पिटन्‍सी’ क्षमता, ज्‍या कर्मचाऱ्याच्‍या ताकदीला परिभाषित करतात, असे देशभरातील संशोधनातून निदर्शनास आले

विशेष भाषेचा अतिवापर
अनेक कार्यालयांत काही प्रमाणात या विशेष भाषेचा वापर अपेक्षित असतो. ७८ टक्‍के भारतीय व्‍यावसायिकांना वाटते की कार्यालयांत विशेष भाषेचा अतिवापर केला जातो. तर ३४ टक्‍के व्‍यावसायिक सांगतात, ते प्रत्‍येक वेळी विशेष भाषेचा वापर करतात आणि त्‍यांच्‍या शब्‍दसंग्रहाचा तो भाग आहे. खरेतर जवळपास तीनपैकी एका भारतीय व्‍यावसायिकाला विशेष भाषेने भारावून टाकल्‍यासारखे वाटते. ते म्‍हणतात, त्‍यांचे सहकारी त्‍यांना न समजणाऱ्या भाषेत बोलतात, असेही संशोधनामधून निदर्शनास आले.

अर्थ न समजल्‍यामुळे गैरसमज
कार्यालयांमध्ये विशेष भाषेच्‍या वापरामुळे संवादामध्‍ये अडथळा येऊन गोंधळ निर्माण होऊ शकतो. निम्‍म्‍याहून अधिक म्हणजेच ५८ टक्‍के भारतीय व्‍यावसायिक म्‍हणतात, त्‍यांना कार्यालयांत वापरल्‍या जाणाऱ्या या विशेष भाषेचा अर्थ न समजल्‍यामुळे किंवा चुकीचा वापर केल्‍यामुळे गैरसमजाचा सामना करावा लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.