‘कुब्रिक’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : नरेंद्र बंडबे लिखित ''कुब्रिक'' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १७) संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. या निमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन इथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदामंगल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सोहळ्याचे आयोजन ‘ओढ हिरवळीची’ संस्थेने केले आहे. स्टॅनली कुब्रिक हे सिनेदिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत १३ चित्रपट बनवले. हे सर्व चित्रपट त्या-त्या काळातल्या गाजलेल्या आणि वादग्रस्त साहित्यावर आधारित होते. ''लोलिता'', ''स्पार्टाकस'', ''ए क्लॉकवर्क ऑरेंज'', ''डॉ. स्ट्रेंजलव्ह'' आणि ''२००१ अ स्पेस ओडिसी'' आदी अजरामर चित्रपट कुब्रिक यांच्या नावावर आहेत. लेखक नरेंद्र बंडबेने ‘कुब्रिक’ या पुस्तकात दिग्दर्शक स्टॅनली कुब्रिक कसा घडला आणि त्याने काय घडवले? याचा आढावा घेतला आहे. नरेंद्र बंडबे गोल्डन ग्लोब या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय मतदार आहे. बर्लिन, कार्लोवी वॅरी सारख्या महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नरेंद्र यांनी हजेरी लावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

