शाहिद कपूर शेल इंडियाचा ब्रॅण्ड अँबॅसडर
मुंबई, ता. १६ : शेल इंडियाने त्यांच्या भारतातील ल्युब्रिकण्ट व्यवसायाचा ब्रॅण्ड ॲम्बेसॅडर म्हणून बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची नियुक्ती केली आहे. मोटरसायकल ऑईलच्या प्रगत श्रेणीसाठी ‘रुकना मुष्किल है’ या नवीन मोहिमेचाही आरंभ आज शेलने केला.
भारतातील दुचाकीस्वारांना डोळ्यापुढे ठेवून आखलेली ही नवीन मोहीम रायडर समुदायाचा गौरव करते. शेल ल्युब्रिकण्ट इंडियाचे वाहनविक्री व मार्केटिंग व्यवस्थापक अमित घुगरे यांनी आज येथे ही घोषणा केली. बायकर्सच्या परिश्रमांना साथ देणे आणि त्यांच्या प्रगतीला शक्ती पुरवणे ही आमच्यापुढील उद्दिष्टे या सहकार्यामुळे अधिक बळकट झाली असल्याचे ते म्हणाले. शाहिद कपूर यांनीही यावेळी या मोहिमेचे स्वागत केले. मोटरसायकल ऑईलची शेल ॲडव्हान्स श्रेणी ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल व रायडिंग शैली डोळ्यापुढे ठेवून विकसित करण्यात आली आहे. यात मिनरल व सिंथेटिक फोर्टी, टूटी मोटरसायकल व स्कूटर इंजिन ऑईल्सचा समावेशही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

