सावित्रीदेवी वसतीगृहाच्या वार्डनवर निलंबनाची कारवाई
मुंबई, ता. १६ : सावित्रीदेवी फुले शासकीय महिला वसतिगृहामध्ये मुलीची हत्या घडून दहा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर तेथील अधीक्षिका (वार्डन) यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची घोषणा केली. या वसतिगृहात झालेल्या दुर्घटनेनंतर सावित्रीदेवी वसतिगृहातील घटनेची प्रशाकीय चौकशी करण्यासाठी रुसाचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक आणि एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांची समिती गठीत करण्यात आली होती, त्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पहिल्या दिवसापासून विद्यार्थिनींच्या पालकांनी या प्रकरणी अधीक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली हेाती. विभागाने नेमलेल्या समितीला अधीक्षिका प्रा. वर्षा आंधळे अनेक प्रकारच्या दिरंगाईनंतर समोर आल्याने त्यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज पाटील यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी मंत्री पाटील यांनी कुबुंबीयांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर व विद्यार्थिनीचे नातेवाईक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

