स्‍कोडा ऑटो कोडियकच्या पुरवठ्यात वाढ

स्‍कोडा ऑटो कोडियकच्या पुरवठ्यात वाढ

Published on

मुंबई, ता. १८ ः कोडियक मोटार बाजारात आणल्‍यानंतर स्‍कोडा ऑटो इंडियाने भारतासाठी जादा मोटारी पुरवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना जलद डिलिव्‍हरी मिळेल.

नवीन कोडियक प्रथम २०२२मध्‍ये भारतात आली; पण वर्षासाठी वाटप केलेल्‍या सर्व मोटारींची विक्री काही आठवड्यांमध्‍येच झाल्याने वाढती मागणी पुरवण्यासाठी कंपनीने भारतात जास्त मोटारी पुरवण्याचे ठरवले आहे. स्‍कोडा ऑटोसाठी भारत ही तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. विशेष तंत्रज्ञानामुळे ही गाडी उच्‍च गतीमध्‍ये सर्वोत्तम नियंत्रण देते. कोडियकसह स्‍लाव्हिया व कुशक या स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या गाड्या अपघात चाचणीतही उत्तीर्ण झाल्या असून या मोटारींना प्रौढ व्‍यक्‍ती व मुलांच्‍या सुरक्षिततेसाठी पाच तारांकित मानांकन मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.